TRENDING:

Crime News : आईच्या उपचारासाठी पैशाची चणचण; अल्पवयीन मुलाचे अपहरण; पुणे पोलिसांनी काही तासांत लावला छडा

Last Updated:

Crime News : आईला दवाखान्यात नेण्यासाठी पेसे नसल्याने आरोपींनी अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी चिंचवड, 12 सप्टेंबर (अविनाश पर्बत, प्रतिनिधी) : आईला रुग्णालयात नेण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार हिंजवडीमध्ये समोर आला आहे. आईच्या उपचारासाठी आरोपीन शहरातील एका व्यावसायिकाच्या 14 वर्षाच्या मुलाचे शस्त्राचा धाक दाखवून 30 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचे समोर आले आहे. या अपहरणकर्त्यांना सासवड पोलिसांच्या मदतीने हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

काय आहे प्रकरण?

तेजस ज्ञानोबा लोखंडे, अर्जुन सुरेश राठोड, विलास संजय म्हस्के अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शस्त्राचा धाक दाखवून खंडणीसाठी एका 14 वर्षीय बालकाचे निळ्या रंगाच्या मारुती झेन या गाडीतून अपहरण करण्यात आले, अशी माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली होती. आरोपीने ज्या मोबाईलवरून फोन केला होता, त्याचे तांत्रिक विश्लेषण करीत पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे 1 पिस्तूल, 1 लांब पात्याचा कोयता, 1 सत्तूर, 1 कटावणी, तोंडाला लावलेले मास्क, एक लोखंडी हातोडी, 3 मोबाईल मिळून आले.

advertisement

वाचा - घरासाठी 4 कोटींची डील पण बायकोला खटकलं, नवऱ्याने संपवलं अन् रुपमध्ये तिला लपवलं!

आईच्या उपचारासाठी अपहरण

या तिघांपैकी एका आरोपीची आई आजारी असल्याने तिच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पैशांची गरज होती. त्यामुळे मुलाच्या अपहरणाचा प्लान केला. त्यानुसार घरासमोरून अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. अपहरणानंतर आरोपींनी मुलाच्या वडिलांना फोन करत धमकी दिली. मुलगा जिवंत हवा असेल तर 30 लाख रुपये घेऊन आम्ही सांगेल त्या ठिकाणी ये असे म्हणत खंडणी मागितली होती. या फोननंतर कुटुंबिय खूप घाबरले. त्यांनी तात्काळ हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेत. तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवत ही कारवाई केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Crime News : आईच्या उपचारासाठी पैशाची चणचण; अल्पवयीन मुलाचे अपहरण; पुणे पोलिसांनी काही तासांत लावला छडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल