घरासाठी 4 कोटींची डील पण बायकोला खटकलं, नवऱ्याने संपवलं अन् रुपमध्ये तिला लपवलं!
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
वकील महिलेची हत्या करण्यात आली होती. तर पती फरार असल्याने आणि त्याचा कोणताही संपर्क होत नसल्याने संशयाची सुईवर होती.
नोएडा : महिला वकीलाचा फोन लागत नसल्याने बहीण अस्वस्थ झाली. त्याने तातडीने याची माहिती पोलिसांना कळवली. त्यांनी वकील महिलेच्या बंगल्यावर जाऊन पाहिल्यानंतर धक्कादायक गोष्ट समोर आली. वकील महिलेची हत्या करण्यात आली होती. तर पती फरार असल्याने आणि त्याचा कोणताही संपर्क होत नसल्याने संशयाची सुईवर होती.
उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर-३० मध्ये डी-४० इथे या महिलेचा मोठा बंगला आहे. या घरात राहणाऱ्या आणि सर्वोच्च न्यायालयात वकील असलेल्या ६१ वर्षीय रेणू सिन्हा यांची बहीण गेल्या दोन दिवसांपासून त्यांना फोन करत होती. दोन दिवस रेणूचा फोन आला नाही तेव्हा तिच्या बहिणीला काळजी वाटू लागली.
रेणू यांचा नवराही फोन उचलत नव्हता. त्यामुळे त्यांना गडबड असल्याचं जाणवलं आणि त्यांनी तातडीनं पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना रेणू यांचा मृतदेह रक्तानं माखलेल्या अवस्थेत बंगल्यात आढळून आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला.
advertisement
रेणूच्या पतीने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला. हत्येनंतर रेणूचा पती फरार होता. अखेर पतीचा फोन ट्रॅक करुन त्याला बंगल्याच्या स्टोअर रुममधून अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने धक्कादायक खुलासा केला.
रेणू यांचा बंगला त्यांच्या पतीला ४ कोटी रुपयांना विकायचा होता. मात्र त्यासाठी रेणू यांची परवानगी नव्हती. काही पैसे नवऱ्याने आधीच अॅडव्हान्स म्हणून घेतले होते. मात्र यावरुन भांडण विकोपाला गेलं आणि रागाच्या भरात पतीनं हत्या केल्याचा खुलासा केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अजून चौकशी सुरू आहे.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
September 11, 2023 4:57 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
घरासाठी 4 कोटींची डील पण बायकोला खटकलं, नवऱ्याने संपवलं अन् रुपमध्ये तिला लपवलं!