नेमकी घटना काय? : फिर्यादी विनायक बसप्पा कुरी (२७) यांनी आरोपी सलमान शेख (३३) याला काही पैसे उसने दिले होते. बुधवारी (२१ जानेवारी) सकाळी विनायक आणि त्यांचे वडील हे उसने दिलेले पैसे परत घेण्यासाठी सलमानकडे गेले होते. मात्र, पैसे देण्याऐवजी सलमानने वाद घालण्यास सुरुवात केली.
advertisement
दगडाने मारहाण आणि धमकी: "मी तुला पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर," असे म्हणत आरोपीने फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी पिता-पुत्राला दगडाने मारहाण करून जखमी केले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
विनायक कुरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सलमान शेख आणि अरबाज शेख (२७) या दोघांना तात्काळ अटक केली आहे. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी साथीदारावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पुण्यात 15 कोटीची फसवणूक
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात शेतमाल निर्यातीच्या व्यवसायात गुंतवणुकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून पुणे, बीड आणि सोलापूरसह राज्यभरातील शेकडो गुंतवणूकदारांना १५ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हडपसर येथील प्रशांत अनिल गवळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.
