मैत्रीचा फायदा आणि फसवणूक: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आरोपी बबलू कुशवाह याच्याशी फेसबुकवर ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर लवकरच मैत्रीत आणि पुढे प्रेमसंबंधात झाले. आरोपीने तरुणीचा पूर्ण विश्वास संपादन केला होता. १३ डिसेंबर रोजी त्याने तरुणीला गाठले आणि "बहिणीचे लग्न आहे, पैशांची अत्यंत गरज आहे," असे भासवत भावनिक साद घातली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तरुणीने त्याला आर्थिक मदत केली. मात्र, पैसे मिळाल्यानंतर आरोपीने तरुणीला टाळण्यास सुरुवात केली आणि फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिसांत धाव घेतली.
advertisement
या प्रकरणी २२ जानेवारी रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी बबलू कुशवाह विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. डिजिटल युगात अनोळखी व्यक्तींशी सोशल मीडियावर मैत्री करताना सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याआधी सोशल मीडियावरील ओळखीतून झालेल्या फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
