धक्कादायक! 'पित्ताचा त्रास दूर करतो'; महिलेला खुर्चीवर बसवत तिघे जवळ आले अन्..., पुण्यात 'बाबा'चं अघोरी कृत्य
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील एका 'ज्योतिषाचार्या'चा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एका पीडित महिलेला खुर्चीवर बसवण्यात आले असून, तिच्याभोवती तिघेजण उभे आहेत
पुणे : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात अंधश्रद्धेचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पित्ताचा त्रास दूर करण्याच्या बहाण्याने एका महिलेवर अघोरी पूजा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेमका प्रकार काय?
पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील एका 'ज्योतिषाचार्या'चा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एका पीडित महिलेला खुर्चीवर बसवण्यात आले असून, तिच्याभोवती तिघेजण उभे आहेत. समोर एका फळ्यावर काही वाक्ये (मंत्र) लिहिलेली आहेत. ती वाक्ये वाचत हे तिघेही जण महिलेभोवती अघोरी प्रयोगासारखे काहीतरी पुटपुटत असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.
फळ्यावरील ते मंत्र वाचल्याने पित्ताचा विकार समूळ नष्ट होतो, असा दावा या ज्योतिषाने केला आहे. हा प्रकार जादूटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन करणारा असून, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
advertisement
या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. "कोणत्याही शारीरिक आजारावर उपचारासाठी केवळ तज्ज्ञ डॉक्टर किंवा वैद्यकीय सल्लागारांकडेच जावे. मंत्र-तंत्र किंवा अघोरी प्रयोगांच्या आमिषाला बळी पडू नका," असे आवाहन चंदननगर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 1:57 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
धक्कादायक! 'पित्ताचा त्रास दूर करतो'; महिलेला खुर्चीवर बसवत तिघे जवळ आले अन्..., पुण्यात 'बाबा'चं अघोरी कृत्य










