advertisement

‘तो’ फक्त लाल रंगाच्याच दुचाकीच चोरायचा, छ. संभाजीनगर पोलिसांनी लावला सापळा, धक्कादायक कारण समोर

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: अनेक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन दिवसांत त्याच्याकडून 15 दुचाकी जप्त केल्या आहेत.

‘तो’ फक्त लाल रंगाच्याच दुचाकीच चोरायचा, कारण..., छ. संभाजीनगर पोलिसांनी असा लावला सापळा
‘तो’ फक्त लाल रंगाच्याच दुचाकीच चोरायचा, कारण..., छ. संभाजीनगर पोलिसांनी असा लावला सापळा
‎छत्रपती संभाजीनगर : एका व्यक्तीच्या आयुष्यातील अपघाती अनुभवच पुढे गुन्ह्याचे कारण ठरल्याचा प्रकार एमआयडीसी सिडको परिसरात उघडकीस आला आहे. स्वतःची दुचाकी चोरीला गेल्यानंतर त्याच चावीने इतर दुचाकी सहज सुरू होत असल्याचे लक्षात येताच, शेख फारुक शेख इस्माईल (वय 48) याने दुचाकी चोरीचा मार्ग स्वीकारला. विशेष म्हणजे, तो केवळ लाल रंगाच्या दुचाकींचीच चोरी करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
‎शेख फारुक हा बांधकामाच्या साइटवर सुपरवायझर म्हणून काम करत होता. काही काळापूर्वी जालना रोड परिसरातून त्याची स्वतःची लाल रंगाची दुचाकी चोरीला गेली होती. त्यानंतर योगायोगाने त्याच्याकडील चावीने स्विच खराब असलेली दुसरी दुचाकी सहज सुरू झाल्याचे त्याच्या लक्षात आले. याच गोष्टीचा गैरफायदा घेत त्याने दुचाकी चोरी करून त्या विक्रीस काढण्यास सुरुवात केली.
advertisement
दरम्यान, प्रोझोन मॉल, एमजीएम कॅम्पस आदी परिसरातील पार्किंगमधून सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक भरत पाचोळे आणि उपनिरीक्षक संजू काळे यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला.
advertisement
‎19 जानेवारी रोजी साध्या वेशात गस्त घालत असताना, चोरीच्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या वेशभूषा आणि बुटांशी साधर्म्य असलेला संशयित सीपेट महाविद्यालयाच्या पार्किंग परिसरात आढळून आला. त्याच्याकडील दुचाकीची तपासणी केली असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
‎अधिक चौकशीत शेख फारुक याने गेल्या आठ महिन्यांत एमजीएम रुग्णालय, जिल्हा न्यायालय परिसर तसेच प्रोझोन मॉलसमोरून अनेक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन दिवसांत त्याच्याकडून 15 दुचाकी जप्त केल्या आहेत. या सर्व दुचाकी त्याने नारेगाव परिसरात प्रत्येकी 10 ते 20 हजार रुपयांत विकल्याचेही तपासात उघड झाले. या कारवाईत अंमलदार संतोष सोनवणे, संजय नंद, प्रकाश सोनवणे, संतोष गायकवाड, परशुराम सोनुने, अरविंद पुरी आणि रतन नागलोत यांनी सहभाग घेतला.
advertisement
‎शेख फारुक हा पूर्वी नारेगाव येथे वास्तव्यास होता. त्याची पत्नी बदनापूर येथील रुग्णालयात नोकरीला असल्याने नारेगावमधील घर विकून तो बदनापूर येथे स्थायिक झाला. 2022 पर्यंत तो आपल्या काकांकडे बांधकाम कंत्राटदाराच्या साइटवर सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. मात्र काकांचे निधन झाल्यानंतर त्याची नोकरी सुटली.
दरम्यान, एका प्लॉटच्या खरेदी-विक्री व्यवहारात तो कर्जबाजारी झाला. आर्थिक अडचणी आणि त्यातच स्वतःची दुचाकी चोरीला गेल्यानंतर त्याने चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. विशेष बाब म्हणजे, तो फक्त लाल रंगाच्या दुचाकींचीच निवड करून चोरी करत होता. आरोपीकडून आणखी दुचाकी जप्त होण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
‘तो’ फक्त लाल रंगाच्याच दुचाकीच चोरायचा, छ. संभाजीनगर पोलिसांनी लावला सापळा, धक्कादायक कारण समोर
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement