प्रणव धंगेकर vs गणेश बिडकर
प्रभाग क्रमांक 24 मधून गणेश बिडकर यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर रिंगणात उतरला आहे. प्रभाग क्रमांक 24 कसबा गणपती, कमला नेहरू आणि केएम हॉस्पिटल या प्रभागातून गणेश बिडकर आणि प्रणव धंगेकर आमने सामने आले आहेत. पुण्यात भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटल्याने आता धंगेकर आणि बिडकर यांच्यात निवडणूक रंगणार आहे.
advertisement
पुण्यातील सर्वात हायप्रोफाईल सीट
माजी आमदार रविंद्र धंगेकरांची पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी प्रभाग क्रमांक 23 मधुन तर मुलगा प्रणव याने प्रभाग क्रमांक 24 मधुन निवडणूक अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे प्रणव धंगेकर विरुद्ध गणेश बिडकर असा सामना पहायला मिळेल. पुण्यातील ही सर्वात हायप्रोफाईल सीट असणार आहे.
कसब्यात कोण बाजी मारणार?
विशेष म्हणजे, 2017 मध्ये रवींद्र धंगेकर यांनी गणेश बिडकर यांचा पराभव केला होता. आता 2017 च्या त्या अटीतटीच्या लढतीची पुनरावृत्ती होणार असून, यावेळी गणेश बिडकर यांच्यासमोर रवींद्र धंगेकरांच्या पुत्राने, प्रणव धंगेकराने मोठे आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे आता कसब्यात कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
