TRENDING:

Atharva Sudame Reel: अथर्व सुदामेला नोटीस, रील करणं भोवलं; नेमकं काय केलं?

Last Updated:

सुप्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्लुएंसर अथर्व सुदामे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याला एक इन्स्टा रिल बनवणं चांगलंच महागात पडलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुप्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्लुएंसर अथर्व सुदामे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याला एक इन्स्टा रिल बनवणं चांगलंच महागात पडलं आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPL) बसमध्ये रिल शूट केल्यामुळे PMPL कडून अथर्वला कायदेशीर नोटीस धाडली आहे. अथर्व सुदामेने गेल्या काही दिवसांपूर्वी एक इन्स्टाग्राम रिल शूट केली होती. ज्यामध्ये त्याने PMPL बस, कंडक्टरचा ड्रेस, ई- मशिन आणि बॅच बिल्ला यांचा अनधिकृत रित्या वापर केला होता. आता तेच त्याला महागात पडलं असून PMPLच्या बसमध्ये विनापरवानगी चित्रीकरण करुन रील सोशल मीडियावर प्रसारित केल्याबाबत स्पष्टीकरण मागितलेय.
Atharva Sudame Reel: अथर्व सुदामेला नोटीस, रील करणं भोवलं; नेमकं काय केलं?
Atharva Sudame Reel: अथर्व सुदामेला नोटीस, रील करणं भोवलं; नेमकं काय केलं?
advertisement

पुण्यातील प्रसिद्ध इन्स्टाग्राम एन्फ्लुएंसर अथर्व सुदामे याला पीएमपीएमएलने नोटीस बजावली आहे. पूर्वपरवानगी न घेता पीएमपीएमएलच्या बसमध्ये रिल काढून त्या रिलमध्ये महामंडळाचा गणवेश, ई-मशीन आणि बॅच बिल्ला यांचा बेकायदेशीर वापर केल्याचा पीएमपीएमएल प्रशासनाकडून आरोप करण्यात आला आहे. सात दिवसाच्या पीएमपीएमएल मुख्यालयात हजर राहून खुलासा द्यावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पीएमपीएमएल प्रशासनाने या नोटीसमध्ये म्हटले आहे. स्थळ पूणे असं कॅप्शन देत गेल्या काही दिवसांपूर्वी अथर्वने इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केली आहे. यामध्ये त्याने एका महिला प्रवाशांचा अवमान केल्याचे चित्रण केलं होतं. यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

advertisement

पत्रात काय नमूद केलं?

पुणे महानगर परिवहन महमहामंडळाच्या (PMPL) मालकीच्या बसमध्ये शुटिंग, महामंडळाचा गणवेश, ई- मशिन किंवा बॅच बिल्ला याचा बेकायदेशीर वापर करून परिवहन महामंडळाचे कोणतीही पूर्व परवानगी न घेता इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड व प्रसारित केल्याचे निदर्शनास आले आहे. रीलमध्ये महिला प्रवाशांचा अवमान आणि अपमानास्पद चित्रण करण्यात आले आहे. या कृत्यामुळे महिला प्रवाशांच्या सन्मान, प्रतिष्ठा, मानसिक सुरक्षितता तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या महिलांच्या हक्कांना बाधा पोहोचत आहे. तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाची जनमानसात प्रतिमा मलिन होत असून पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अंतर्गत नियम, धोरणाच्या विरोधात आहे. परिवहन महामंडळाची प्रतिमा, व्यावसायिक हित व सार्वजनिक बस सेवे वरील विश्वासावर विपरित परिणाम होत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात तेजी, कपाशी, तूर आणि सोयाबीनला किती मिळाला शुक्रवारी भाव? Video
सर्व पहा

आपणास या नोटीसद्वारे कळविण्यात येत आहे की सदर आक्षेपार्ह रील तत्काळ इन्स्टाग्राम वरुन काढून टाकावे. तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील सक्षम प्राधिकरणाची लेखी परवानगी घेतल्याशिवाय भविष्यात महामंडळाच्या बस सेवेबाबत कोणतेही फोटो/ व्हिडिओ/ रील किंवा मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करू नये. आपणांस सदर नोटीस प्राप्त दिनांकापासून सात दिवसांच्या आत लेखी खुलासा पुणे महानगर परिवहन महामंडळ, मुख्य कार्यालय, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे 411037 येथे सादर करावा. सदरील खुलासा विहित मुदतीत परिवहन महामंडळास सादर न केल्यास तसेच सदर इन्स्टाग्राम वरील रिल हटविण्यात कसूर केल्यास, आपल्याविरुद्ध प्रचलित कायदे व नियमांनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Atharva Sudame Reel: अथर्व सुदामेला नोटीस, रील करणं भोवलं; नेमकं काय केलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल