पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावी, अशी भूमिका समोर येताच प्रशांत जगताप यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. त्यानंतर आता शरद पवारांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय, असं अंदाज बांधला जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत एक समिती गठित करण्यात आली होती. त्यात प्रशांत जगताप यांना स्थान देण्यात आलं नव्हतं.
advertisement
प्रशांत जगताप नाराज
समिती गठित झाल्यानंतर शहराध्यक्षपदी असताना देखील चर्चेसाठी सहभागी न केल्याने प्रशांत जगताप यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली अन् यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अजितदादांसोबत हातमिळवणी करण्यास शरद पवार गटाने सकारात्मक दृष्टीकोन दाखवल्याने प्रशांत जगताप नाराज होते.
शब्द खरा करून दाखवला
शरद पवार असो किंवा अजित पवार असो, यांच्यावर माझं प्रेम आहे आणि राहील. पण 2023 मध्ये माझ्यावर दबाव असूनही मी शरद पवारांची साथ सोडली नाही. पण ज्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रित आघाडीची घोषणा होईल त्यावेळी मी राजीनामा देईन, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं होतं. अशातच आता त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवलाय.
