मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी बनावट ग्राहक बनून हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या आरोपीला रंगेहाथ पकडले.
परराज्यातील महिलांना फसवून पुण्यात आणलं
पोलिसांनी हॉटेलमध्ये टाकलेल्या छाप्यात एका विदेशी महिलेसह दोन परराज्यातील अशा एकूण तीन महिलांची सुटका केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आदित्य अनिलकुमार सिंह असे आहे.
advertisement
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं उघड झालं आहे की, आरोपी आदित्य सिंह हा परराज्यातील गरजू आणि गरीब कुटुंबातील मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत होता. त्यांना पुण्यात आणून त्यांच्याकडून बळजबरीने हा वेश्याव्यवसाय करून घेत होता. आता या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का? त्याला कुणी मदत करत होतं का? तसेच या रॅकेटमध्ये आरोपीनं आणखी काही महिलांना अडकवलं आहे का? याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.
