TRENDING:

6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; आरोपीला आईनं पण दिली साथ, पुण्याला हादरवणाऱ्या 'त्या' प्रकरणातील फाशीची शिक्षा का झाली रद्द?

Last Updated:

मावळ तालुक्यात ऑगस्ट २०२२ मध्ये एका ६ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले होते. या प्रकरणात नराधम तेजस दळवीला फाशीची, तर त्याच्या आईला सात वर्षांची शिक्षा सुनावली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या एक घटनेत आता मुंबई उच्च न्यायलायने मोठा निकाल दिला आहे. मावळ तालुक्यात ऑगस्ट २०२२ मध्ये एका ६ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले होते. या प्रकरणात विशेष पोक्सो न्यायालयाने नराधम तेजस दळवीला फाशीची, तर त्याला मदत करणाऱ्या त्याच्या आईला सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाने या फाशीच्या शिक्षेवर मोठा आक्षेप घेत ती रद्दबातल ठरवली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा केली रद्द (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा केली रद्द (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

मावळमधील शाळेजवळ ही मुलगी बेपत्ता झाली होती आणि नंतर तिचा मृतदेह झुडपात सापडला होता. तपासात तेजस दळवी हा अश्लील चित्रफिती सतत पाहात असून तो रुग्ण असल्याचे समोर आले होते. तसेच या गुन्ह्यात त्याच्या आईनेही त्याला मदत केल्याचे निष्पन्न झाले होते. पोक्सो न्यायालयाने मार्च २०२४ मध्ये या माय-लेकाला दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळी दर घसरलेलेच, लिंबू आणि कांद्याला काय मिळाला भाव, एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी कायदेशीर प्रक्रियेतील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधले. खटल्यात १२ महत्त्वाच्या रासायनिक अहवालांचा आधार घेण्यात आला, परंतु या अहवालांच्या विश्लेषकाची उलटतपासणी करण्याची संधी आरोपींना देण्यात आली नाही. याशिवाय, फौजदारी दंड संहिता कलम ३१३ अन्वये आरोपींचे जबाब स्वतंत्रपणे नोंदवणे बंधनकारक असताना, न्यायालयाने त्यांना एकत्रित प्रश्न विचारून जबाब नोंदवले होते. हा कायदेशीर प्रक्रियेचा भंग असल्याचे मानत न्या. मनीष पितळे आणि न्या. श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठाने पोक्सो न्यायालयाचा निकाल रद्द केला. आता पोक्सो न्यायालयाला या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून चार महिन्यांत नव्याने अंतिम निकाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; आरोपीला आईनं पण दिली साथ, पुण्याला हादरवणाऱ्या 'त्या' प्रकरणातील फाशीची शिक्षा का झाली रद्द?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल