पुण्याच्या लोणी काळभोर येथील जॉयनेस्ट सोसायटीत ही घटना घडली आहे. या घटनेत निष्कर्ष रेड्डी हा चिमुरडा सोसायटीच्या आवारात सायकल चालवत होता. या दरम्यान सोसायटीत एक भरधाव Maruti Wagon R कार शिरली. या गाडीचा कारचालक कोणत्या धुंदीत होता काय माहित त्याने थेट समोरच सायकल चालवणाऱ्या निष्कर्ष रेड्डीला चिरडलं होतं. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली होती. ही संपूर्ण घटना सोसायटीत लावलेल्या कॅमेरात कैद झाली होती.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार गाडीचालक हा 23 वर्षीय तरूण होता. हा तरूण जॉयनेस्ट येथे राहणाऱ्या आपल्या मित्राला सोडायला आला होता. या दरम्यान कार चालवत असताना सदरचा मुलगा हा चारचाकी गाडीच्या डाव्या बाजूच्या चाकाखाली आला. त्यामुळे त्याच्या अंगावरून दोन्ही टायर गेले. या अपघातात मुलगा निष्कर्ष रेड्डी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व तो बेशुद्ध पडला. यावेळी चारचाकी चालक अथर्व कवडे याने तात्काळ आपल्या गाडीत टाकून विश्वराज हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
.या अपघातानंतर चारचाकी चालकाला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अथर्व रमेश कवडे (वय 23 रा. सध्या माहिती नाही) असे चारचाकी चालकाचे नाव आहे. लोणी काळभोर येथील एमआयटी या शौक्षणिक संकुलात शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली आहे.याप्रकरणी चालक तरुणाला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत असून पुढील तपास सूरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
