मी पोलिसाचा मुलगा आहे
प्रत्यक्ष घटनेनुसार, नारायण पेठ परिसरात एका मद्यधुंद तरुणाने आणि तरुणीने भरधाव वेगाने वाहन चालवत रस्त्यावरील उभ्या असलेल्या काही गाड्यांना धडका दिल्या. यानंतर स्थानिक नागरिक जाब विचारण्यासाठी गेले असता, त्या तरुणाने "मी पोलिसाचा मुलगा आहे" असे म्हणत आरडाओरडा सुरू केला. सुदैवाने या ॲक्सिडेंटमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही, परंतु स्थानिकांच्या गाड्यांचे नुकसान झाले असून तरुणाच्या अरेरावीमुळे वाद विकोपाला गेला होता.
advertisement
पाहा Video
दोन्ही बाजूंची तक्रार दाखल
दरम्यान, हा सर्व प्रकार विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असून, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नारायण पेठेत रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या गोंधळानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूंची तक्रार दाखल करून घेतली असून पुढील तपास सुरू आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
