ही कारवाई शनिवारी (२७ डिसेंबर) दुपारी आळंदी-मरकळ रस्त्यावरील घोलप वस्तीत करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम पद्माकर अडागळे (वय २७) आणि अक्षय ऊर्फ दाद्या वरनकर (वय ३०) या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अक्षयने हा मौल्यवान पदार्थ शुभम याला विक्रीसाठी दिला होता. गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार हर्षद कदम यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
advertisement
व्हेल माशाची उलटी इतकी महाग का असते?
अंबरग्रीस म्हणजेच व्हेल माशाची उलटी हा पदार्थ व्हेलच्या शरीरात तयार होतो. हा मेणासारखा पदार्थ समुद्रात तरंगत असताना काळानुसार कडक होतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याला 'तरंगतं सोनं' म्हटलं जातं. महागड्या परफ्युम्सचा सुगंध बराच काळ टिकवून ठेवण्यासाठी या पदार्थाचा 'फिक्सेटिव्ह' म्हणून वापर केला जातो. जगातील अनेक नामांकित ब्रँड्समध्ये याचा वापर होतो. काही देशांमध्ये पारंपारिक औषधे आणि सुगंधी धूप तयार करण्यासाठी अंबरग्रीसचा वापर केला जातो. भारतात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत व्हेल मासा हा संरक्षित प्राणी आहे. त्यामुळे अंबरग्रीसची विक्री, साठा करणे किंवा तस्करी करणे हा गंभीर दखलपात्र गुन्हा असून यामध्ये १० वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
