TRENDING:

Pune : अमिताभ गुप्ता यांच्यासह वैष्णवी हगवणे प्रकरणातील जालिंदर सुपेकरांना क्लिन चिट! गृहविभागाचा मोठा निर्णय

Last Updated:

Pune Vaishanavi Hagawane Case : अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळात वाटप करण्यात आलेल्या शस्त्रपरवान्यांमध्ये कोणताही बेकायदा प्रकार घडला नसल्याचे गृहविभागाने स्पष्ट केले आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pune Arms License Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या आत्महत्येनंतर पुणे पोलिसांनी दिलेले शस्त्रपरवाने वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. जालिंदर सुपेकर यांनी आपले भाचे असलेल्या हगवणे बंधूंना शस्त्रपरवाना मिळवून देण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी झाल्यानंतर सुपेकर यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) पदावरून गृहरक्षक दलात कमी महत्त्वाच्या पदावर बदली करण्यात आली होती, मात्र आता चौकशीअंती त्यांच्यावरील हे आरोप फेटाळले गेले आहेत. अमिताभ गुप्ता यांच्यासह वैष्णवी हगवणे प्रकरणातील जालिंदर सुपेकरांना क्लिन चिट मिळाली आहे.
Pune Amitabh Gupta and Jalinder Supekar Clean Chit
Pune Amitabh Gupta and Jalinder Supekar Clean Chit
advertisement

शस्त्रपरवान्यांमध्ये बेकायदा प्रकार?

पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळात वाटप करण्यात आलेल्या शस्त्रपरवान्यांमध्ये कोणताही बेकायदा प्रकार घडला नसल्याचे गृहविभागाने स्पष्ट केले आहे. सर्व 433 परवाने हे 'शस्त्र अधिनियम 1959 ' आणि 'शस्त्र नियम 2016' मधील अटी व शर्तींचे पालन करूनच देण्यात आले आहेत. या खुलाशामुळे गेल्या दोन वर्षांपासून गंभीर आरोपांचा सामना करणाऱ्या या दोन्ही आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून ते या प्रकरणातून निर्दोष ठरले आहेत.

advertisement

पुनर्वसनाचा मार्ग आता मोकळा

अमिताभ गुप्ता यांच्या सेवा कालावधीत मंजूर केलेले सर्व शस्त्रपरवाने कायदेशीर तरतुदीनुसारच प्रदान करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. या निर्णयामुळे गेल्या दोन वर्षांपासून साईड पोस्टिंगवर असलेल्या या दोन्ही बड्या अधिकाऱ्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग आता मोकळा झाला असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगू लागली आहे.

एसीबीकडे कोणतीही तक्रार नाही

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चांगापूरचं प्रसिद्ध हनुमान मंदिर, ‘त्या’ विहिरीला 108 प्रदक्षिणा, पूर्ण होतात मनोकामना, Video
सर्व पहा

जालिंदर सुपेकर आणि पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या चौकशीत चव्हाण यांची मालमत्ता 'असंपदा' असल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. तसेच सुपेकर यांच्या विरोधात एसीबीकडे कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गृहविभागाने या मालमत्ता प्रकरणाची चौकशी आता अधिकृतपणे बंद केली आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune : अमिताभ गुप्ता यांच्यासह वैष्णवी हगवणे प्रकरणातील जालिंदर सुपेकरांना क्लिन चिट! गृहविभागाचा मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल