TRENDING:

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडणार नवा सेतू, ‘त्या’ मार्गाचं लोकार्पण, अजितदादांनी केलं होतं उद्घाटन

Last Updated:

Pune News: या पुलाचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. तर आता त्याचे लोकार्पण झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा मुळा नदीवरील पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला झाला आहे. सांगवी-बोपोडी पुलाचे ‘सरकार शितोळे सेतू’ असे नामकरण करण्यात आले आहे. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून सुशोभीकरण कामामुळे बंद असणाऱ्या पुलावरून वाहतूक बंद होती. मात्र, हे काम पूर्ण झाले असून सोमवारपासून पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली आहे. हा पूल शहरवासीयांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडणार नवा ‘सेतू’, ‘त्या’ मार्गाचं लोकार्पण, अजितदादांनी केलं होतं उद्घाटन
पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडणार नवा ‘सेतू’, ‘त्या’ मार्गाचं लोकार्पण, अजितदादांनी केलं होतं उद्घाटन
advertisement

अजित दादांनी केले होते उद्घाटन

सांगवी बोपोडी पूल हा पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. या पुलाचे भूमिपूजन 5 जानेवारी 2022 रोजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर 14 ऑक्टोबर 2024 रोजी या पुलाचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. तर नुकतेच या पुलाचे लोकार्पण झाले. या कार्यक्रमास महापौर रवी लांडगे, आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

advertisement

खाजगी ट्रॅव्हल्सची लूट थांबणार! पुणे विभागाकडून 74 जादा एसटी बसचे गिफ्ट; कधीपासून सेवा सुरू?

कसा आहे पूल?

सरकार शितोळे सेतू हा सुमारे 760 मीटर लांबीचा आहे. या पुलासाठी तब्बल 40 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. पुलावर आकर्षक कमान असून तिची उंची 26 मीटर, तर वजन सुमारे 650 टन आहे. वास्तुविशारद श्रुती शहा यांनी या कमानीची रचना केली आहे. पुलाच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी जवळपास 10 महिन्यांचा कालावधी लागला.

advertisement

तांत्रिक अडचणी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Youtube वर पाहिलं अन् निर्णय घेतला, नोकरी करत सुरू केला थंडगार पेयाचा व्यवसाय, आता डबल कमाई
सर्व पहा

दरम्यान, पुण्यातील या महत्त्वाच्या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, यामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यात दुभाजक नसल्यामुळे पुलाचा सध्या एकमार्गीच वापर करावा लागत आहे. वाहनचालकांना पुढे जाऊन वळसा घ्यावा लागतो. त्यामुळे बोपोडी मार्गे सांगवीकडे येण्यासाठी दुभाजकाची मागणी होत आहे.

मराठी बातम्या/पुणे/
पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडणार नवा सेतू, ‘त्या’ मार्गाचं लोकार्पण, अजितदादांनी केलं होतं उद्घाटन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल