अमन शेख आणि अरबाज पटेल यांनी दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने हा खून केला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी अमन शेख, अरबाज पटेल आणि मयूर वाघमारे अशा तीन आरोपींना अटक केली. कोंढवा पोलिसांनी मयत गणेश काळेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला. या हत्या प्रकरणानंतर आता गणेश काळे खून प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आपला मर्डर होणार असल्याची माहिती आधीपासून गणेश काळेला होती, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
advertisement
आंदेकर टोळीचे गुंड दुचाकीने आपला पाठलाग करतात, याची माहिती आधीपासून गणेश काळेला होती. त्याच्या एका मित्रानेही त्याला अलर्ट केलं होतं. पण अखेर शनिवारी गणेश काळे आंदेकर टोळीचा बळी ठरला.
गणेश काळे अस्वस्थ होता
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश काळे हा आई, वडील, पत्नी समवेत येवलेवाडी परिसरात राहायचा. तो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. वनराजच्या खून प्रकरणात त्याच्या भावाला अटक करण्यात आली होती. त्यामुळे आंदेकर टोळीचे साथीदार दुचाकीवरून आपला पाठलाग करत असल्याचं त्याने सांगितलं होते. गणेशच्या मित्रानेही त्याला आंदेकर टोळीचे साथीदार खून करण्याच्या प्रयत्नात असल्याचं सांगितले होतं, त्यामुळे तो अस्वस्थ होता, असं तक्रारीत वडिलांनी नमूद केलं आहे.
