साने गुरुजी वसाहतीत खोली मिळाली पण...
मयंक हा मूळचा जनता वसाहत परिसरातील रहिवासी आहे. त्याची आई पुणे महापालिकेत नोकरीला असून त्यांना काही महिन्यांपूर्वी पुणे महापालिकेच्या साने गुरुजी वसाहतीत खोली मिळाली होती. त्यामुळे हे कुटुंब या वसाहतीत वास्तव्याला आले. मात्र, मयंकचा वावर जनता वसाहतीतच अधिक होता. मयंकची मित्र कंपनी जनता वसाहत इथंच असल्याने तो तिथं सारखा जात असायचा.
advertisement
मयंकच्या मित्रांची एकाला मारहाण
जनता वसाहत परिसरात गेल्या दोन वर्षांपासून गुंडगिरी वाढली असून तेथील टोळीयुद्धात गेल्या दोन वर्षांत तीन जणांचा बळी गेला. तसेच दहाहून अधिक जण जायबंदी झाले आहेत. तेथील काही गुंडांशी मयंक याची भांडणं झाली होती. त्यातून दोन दिवसांपूर्वी मयंकच्या मित्रांनी एकाला मारहाण केली होती. त्यामुळे तेथील काही जण त्याच्या मागावर होते, अशी माहिती समोर आली आहे.
दुपारी सव्वा तीनच्या सुमारास काय घडलं?
दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयंकच्या हत्येमागे नव्याने उदयास आलेल्या 'माया टोळी'चे कृत्य असल्याचा संशय आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यात मयंक या तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास बाजीराव रोडवरील महाराणा प्रताप उद्यानाजवळ, दखनी मिसळसमोर ही घटना घडली. या खून प्रकरणात अभिजीत पाटील उर्फ माया, अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
