आरोपींनी केस कोयत्याने छाटले आणि बोट कापलं
मयत मयंक खराडे आणि त्याचा मित्र अभिजीत इंगळे टुव्हिलरवरून जात असताना जनता वसाहतमधील मास्क लावलेल्या तीन तरुणांनी त्यांचा पाठलाग केला अन् त्यांना गाठलं. त्यावेळी आरोपींनी धारदार शस्त्रांचा, विशेषत: कोयत्याचा वापर करत मयंक खराडे याच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. त्यामुळे त्याचा मित्र अभिजीत देखील घाबरला. या हल्ल्यात आरोपींनी मयंक खराडेचे केस कोयत्याने छाटले आणि बोटही कापल्याची माहिती मिळाली आहे. आरोपींच्या या क्रूर हल्ल्यात मयंक खराडे याचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
आंदेकर टोळीचा पॅटर्न
आरोपींनी कापलेले बोट रस्त्यावर पडल्याचं दृश्य पाहायला मिळालं होतं. त्यामुळे बाजीराव रोडवर एकच खळबळ उडाली होती. दुपारच्या सव्वा तीन वाजता घटना घडल्याने पुण्यात बातमी वाऱ्यासारखी पसरली. बाजीराव रोडवरील महाराणा प्रताप उद्यानाजवळ, दखनी मिसळसमोर ही घटना घडली. मयंक खराडेच्या खून प्रकरणात अभिजीत पाटील उर्फ माया, अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे या तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पण यावेळी माया टोळीने आंदेकर टोळीचा पॅटर्न वापरला.
पुण्यातील कोयता पॅटर्न कधी संपणार?
पोलिसांनी अटक केलेले आरोपी देखील अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच हत्या करण्यासाठी आंदेकर टोळीप्रमाणे माया टोळीने देखील कोयत्याचा वापर केला होता. त्यामुळे आता पुण्यातील कोयता पॅटर्न कधी संपणार? असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत.
माया टोळीचा म्होरक्या कोण?
दरम्यान, अभिजीत पाटील हा माया टोळीचा म्होरक्या आहे. सततच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याला पुणे शहरातून तडीपार करण्यात आले आहे. अतिशय तरुण वयात अभिजीत उर्फ मायाने गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला. अभिजीत हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या नावावर गंभीर मारहाण, हत्येचा प्रयत्न, खंडणी आदी गुन्हे दाखल आहेत.
