नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गंगाचा विवाह तेजस बेंबळकर याच्याशी झाला होता. तेजसने अमेरिकेतून उच्चशिक्षण घेतले आहे. मात्र, सुशिक्षित कुटुंब असूनही लग्नानंतर काही दिवसांतच गंगाला सासरच्यांकडून मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. या छळाला कंटाळून अखेर तिने बाणेरमधील आपल्या राहत्या इमारतीवरून उडी घेतली.
सुसाईड नोट आणि गुंता
पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये गंगाने 'माझ्या मृत्यूला मी स्वतः जबाबदार आहे' असे लिहिले आहे. मात्र, मृत महिलेच्या वडिलांनी सासरच्यांविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. सासरच्या जाचामुळेच तिने हे पाऊल उचलल्याचा दावा वडिलांनी केला आहे. त्यावरून पोलिसांनी पती तेजस शिवा बेंबळकर, सासू, सासरे आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
सुसाईड नोटमध्ये स्वतःला जबाबदार धरले असले, तरी लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांत नवविवाहितेने आत्महत्या केल्यामुळे पोलीस या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहेत. सासरच्या मंडळींकडून नेमका कोणत्या कारणावरून छळ होत होता? सुसाईड नोटवर कुणाचा दबाव होता का? या दिशेने बाणेर पोलीस सखोल तपास करत आहेत.
