TRENDING:

बहीण-भाऊ अंगणात खेळत होते; पण काळ धावून आला अन् क्षणात गायब झालं ते निरागस हास्य, चिमुकलीचा मृ्त्यू

Last Updated:

घराच्या अंगणात झाडाच्या सावलीत खेळत असलेल्या दोन चिमुकल्या बहीण-भावांना एका भरधाव टेम्पोने चिरडले. या भीषण अपघातात ८ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्याच्या भोर तालुक्यातील पिराचा मळा परिसरात एक अत्यंत भीषण आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. घराच्या अंगणात झाडाच्या सावलीत खेळत असलेल्या दोन चिमुकल्या बहीण-भावांना एका भरधाव टेम्पोने चिरडले. या भीषण अपघातात ८ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तिचा ६ वर्षांचा भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
भरधाव टेम्पोनं दोघांना चिरडलं
भरधाव टेम्पोनं दोघांना चिरडलं
advertisement

अंगणात खेळतानाच काळ धावून आला

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे उत्तर प्रदेशातील असलेले राधेशाम भारती हे भोरमधील पिराचा मळा येथील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. रविवारी त्यांची मुलगी पायल राधेशाम भारती (वय ८) आणि मुलगा लवकुश राधेशाम भारती (वय ६) हे घरासमोरील अंगणात झाडाच्या सावलीत खेळत होते. त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका भरधाव टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेला टेम्पो रस्ता सोडून थेट घराच्या अंगणात घुसला आणि खेळत असलेल्या मुलांना जोराची धडक दिली.

advertisement

हा अपघात इतका भीषण होता की, पायल टेम्पोच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच करुण अंत झाला. तर लवकुश टेम्पोच्या धडकेने लांब फेकला गेला. या धडकेत लवकुशचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी लवकुशवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपल्या डोळ्यादेखत खेळणाऱ्या मुलांचा असा अपघात झाल्याने भारती कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

advertisement

भोर पोलिसांत गुन्हा दाखल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी भोर पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्या चालकांमुळे निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागत असल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

मराठी बातम्या/पुणे/
बहीण-भाऊ अंगणात खेळत होते; पण काळ धावून आला अन् क्षणात गायब झालं ते निरागस हास्य, चिमुकलीचा मृ्त्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल