हॉटेलवर रूम बूक केली अन्...
सर्व तरुण सोमवारी रात्री उशिरा पुण्यातून आलिशान कारने निघाले होते. मंगळवारी सकाळपासून त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्यामुळे काही तरुणांच्या पालकांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोरांनी कोकणात जाण्याआधीच एका हॉटेलवर रूम बूक केली होती. पण पोरं वेळेत न आल्याने हॉटेलच्या मालकाने तरुणाच्या एका मित्राला फोन केला अन् अजूनी आली नाहीत, याची माहिती दिली. त्यानंतर पोरांची शोधाशोध सुरू झाली. पोलीस चौकीत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या मोबाइल फोनचे लोकेशन ताम्हिणी घाटात असल्याचे शोधून काढलं.
advertisement
ताम्हिणी घाटामधील अवघड वळणावर...
गुरुवारी सकाळी माणगाव पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. सीसीटीव्ही तसेच तरुणांच्या मोबाइल लोकेशनच्या माध्यमातून तपास करताना पोलिस ताम्हिणी घाट परिसरापर्यंत येऊन पोहोचले. गुरुवारी पोलिसांनी फोनच्या लोकेशन आधारे ताम्हिणी घाटामधील अवघड वळणावर असलेल्या अपघातप्रवण ठिकाणी ड्रोनच्या मदतीने शोध घेण्यास सुरुवात केली. खोल दरीमध्ये गाडी आण चार मृतदेह ड्रोनच्या माध्यमातून दिसून आलं. त्यावेळी सर्वांच्या हृद्याचे ठोके चुकले. मात्र, गाडी व मृतदेह हे खूप खोल दरीमध्ये असल्यामुळे शोधकार्य खूपच कठीण झालं होतं.
अपघातातील तरुणांची नावे
1) साहिल गोठे (वय 24)
2) शिवा माने (वय 20)
3) प्रथम चव्हाण (वय 23)
4) श्री कोळी (वय 19)
5) ओमकार कोळी (वय 20)
6) पुनीत शेट्टी (वय 21)
कारचा वेग प्रचंड असावा
दरम्यान, पुणे पोलिसांनी माणगाव पोलिस, रायगड आपत्ती व्यवस्थापन, मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध कार्य करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सहाजणांची बॉडी सापडल्याची माहिती मिळतीये. कोसळलेल्या थार कारच्या वेगात लोखंडी बॅरिगेट्स आणि येथील लोखंडी खांबाचे तुकडे होऊन पडलेत त्यामुळे या कारचा वेग प्रचंड असावा असा अंदाज व्यक्त होतोय.
