TRENDING:

पुणे ते छ. संभाजीनगर सुसाट, 250 किमीचं अंतर अवघ्या 3 तासांत, गेमचेंजर प्रकल्पाच्या कामाला वेग

Last Updated:

Pune Chhatrapati Sambhajinagar Highway: भारतमाला फेज-2 अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत असून बीओटी तत्वावर उभारला जाणार आहे. केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी चार वर्षांपूर्वी या महामार्गाची घोषणा केली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुणे–छत्रपती संभाजीनगर द्रुतगती मार्ग प्रकल्पाला अखेर वेग आला आहे. या महामार्गासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सुमारे 2200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रीनफिल्ड पद्धतीने उभारल्या जाणाऱ्या या सहा पदरी महामार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या तीन तासांत पूर्ण होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
News18
News18
advertisement

या महामार्गाचा पहिला टप्पा खराडी जंक्शन ते शिरूर बायपास दरम्यान सुमारे 53.4 किमीचा एलिव्हेटेड सहा लेन मार्ग म्हणून विकसित केला जाणार आहे. दुसरा टप्पा शिरूर बायपास ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान सुमारे 192.5 किमी लांबीचा नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग असेल. शिरूर ते खराडी प्रकल्पासाठी वेल्सपण इंटरप्रायझेसला एल-वन बोलीदार म्हणून काम देण्यात आले असून नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

advertisement

प्रवाशांसाठी खुशखबर, होळीमध्ये गावी जाण्यासाठी पुण्यातून अतिरिक्त ट्रेनची सोय, चेक करा वेळापत्रक

शिरूर–छत्रपती संभाजीनगर दरम्यान चार टोल नाके प्रस्तावित आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर दरम्यान विद्यमान रस्त्याच्या नूतनीकरणाचेही नियोजन करण्यात आले आहे. खेड–शिरूरमार्गे छत्रपती संभाजीनगरला जोडला जाणारा हा मार्ग पुणे–नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत करेल.

या प्रकल्पामुळे पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, वाळूज, शेंद्रा एमआयडीसी तसेच बीड आणि जालना या औद्योगिक क्षेत्रांना मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांतील अंतर कमी होऊन औद्योगिक मालवाहतूक सुलभ होईल व आर्थिक विकासाला चालना मिळेल.

advertisement

भारतमाला फेज-2 अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत असून बीओटी तत्वावर उभारला जाणार आहे. केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी चार वर्षांपूर्वी या महामार्गाची घोषणा केली होती. प्रारंभी प्रकल्प भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे होता. मात्र, अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे सोपविण्यात आली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंबला 13000 रुपये भाव, आल्याचे दरही सुधारले, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

सध्या भूसंपादन प्रक्रिया संबंधित महसूल विभागामार्फत वेगाने सुरू आहे. हा महामार्ग हवेली, भोर, दौंड, शिरूर आणि पुरंदर या तालुक्यांतून जाणार असल्याने स्थानिक विकासालाही चालना मिळणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुणे ते छ. संभाजीनगर सुसाट, 250 किमीचं अंतर अवघ्या 3 तासांत, गेमचेंजर प्रकल्पाच्या कामाला वेग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल