advertisement

प्रवाशांसाठी खुशखबर, होळीमध्ये गावी जाण्यासाठी पुण्यातून अतिरिक्त ट्रेनची सोय, चेक करा वेळापत्रक

Last Updated:

पुण्यामध्ये नोकरी किंवा व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिक स्थायिक झाले आहेत. सणाच्या काळात अनेकजण सण साजरा करण्यासाठी आपल्या गावी जातात. या काळात रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो.

News18
News18
पुणे : पुण्यामध्ये नोकरी किंवा व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिक स्थायिक झाले आहेत. सणाच्या काळात अनेकजण सण साजरा करण्यासाठी आपल्या गावी जातात. या काळात रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून होळीच्या सणासाठी काही स्पेशल ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे होळीच्या काळात नागरिकांना गावी जाण्यासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहेत. दानापूर, गोरखपूर, गाझीपूर शहर आणि हजरत निजामुद्दीन या ठिकाणांसाठी या विशेष गाड्या धावणार आहेत.
होळीच्या सणासाठी पुणे-नागपूर विशेष ट्रेन
पुणे–नागपूरदरम्यान होळीच्या सणानिमित्त काही विशेष गाड्या धावणार आहेत. गाडी क्रमांक 01469 ही 24 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी दुपारी 1:50 वाजता पुण्याहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता नागपूर पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक 01470 ही 25 फेब्रुवारी आणि 4 मार्च रोजी सकाळी 8:00 वाजता नागपूरहून निघेल आणि रात्री 11:30 वाजता पुण्यात येईल.
advertisement
पुणे-गोरखपूर (32 फेऱ्या)
गाडी क्रमांक 01415 ही 21 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान रोज सकाळी 6:50 वाजता पुण्याहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 4:00 वाजता गोरखपूरमध्ये पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक 01416 ही 22 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान रोज सायंकाळी 5:30 वाजता गोरखपूरहून निघून तिसऱ्या दिवशी पहाटे 3:15 वाजता पुण्यात पोहोचेल.
advertisement
पुणे ते दानापूर
पुणे ते दानापूर दरम्यान 21 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान दररोज नवीन दैनिक विशेष गाडी सेवा सुरू होणार आहे. गाडी क्रमांक 01459 रोज दुपारी 3:30 वाजता पुण्याहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे 2:45 वाजता दानापूर येथे पोहोचेल. परतीसाठी गाडी क्रमांक 01450 23 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान दररोज सकाळी 5:00 वाजता दानापूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6:15 वाजता पुण्यात येईल.
advertisement
पुणे–दानापूर द्वि-साप्ताहिक सेवा
पुणे ते दानापूर दरम्यान 23, 27 फेब्रुवारी आणि 2 व 6 मार्च रोजी सायंकाळी 7:55 वाजता गाडी क्रमांक 01481 पुण्याहून सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे 4:20 वाजता दानापूर येथे पोहोचेल. परतीसाठी गाडी क्रमांक 01482 25 फेब्रुवारी, 1, 4 आणि 8 मार्च रोजी सकाळी 8:00 वाजता दानापूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6:15 वाजता पुण्यात पोहोचेल.
advertisement
पुणे-गाझीपूर शहर द्वि-साप्ताहिक
पुणे ते गाझीपूर शहर दरम्यान 24, 27 फेब्रुवारी आणि 3 व 6 मार्च रोजी सकाळी 6:40 वाजता गाडी क्रमांक 01431 / 01432 पुण्याहून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7:05 वाजता गाझीपूर येथे पोहोचेल. परतीसाठी गाड्या 26 फेब्रुवारी, 1, 5 आणि 8 मार्च रोजी पहाटे 4:20 वाजता गाझीपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4:20 वाजता पुण्यात पोहोचतील.
advertisement
पुणे–हजरत निजामुद्दीन साप्ताहिक सेवा (चार फेऱ्या)
पुणे ते हजरत निजामुद्दीन दरम्यान 27 फेब्रुवारी आणि 6 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता गाडी क्रमांक 01491 / 01492 पुण्याहून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7:00 वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचेल. परतीसाठी गाड्या 28 फेब्रुवारी आणि 7 मार्च रोजी रात्री 12:10 वाजता हजरत निजामुद्दीनहून सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी 6:40 वाजता पुण्यात पोहोचतील. या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण 18 फेब्रुवारीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर सुरू झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
प्रवाशांसाठी खुशखबर, होळीमध्ये गावी जाण्यासाठी पुण्यातून अतिरिक्त ट्रेनची सोय, चेक करा वेळापत्रक
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement