लहान स्पीड ब्रेकर ब्रेक फेल?
राजस्थान पासिंगचा एक कंटेनर साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेनं जात होता. नवले पुलावर सेल्फी पॉईंट असलेल्या भागात या ट्रकचा ब्रेक फेल झाला असण्याची शक्यता आहे. उतारावर मोठ्या प्रमाणावर लहान स्पीड ब्रेकर आहेत, त्यामुळे ब्रेक फेल झाल्याची शक्यता आहे, असं डीसीपी संभाजी कदम यांनी सांगितलं आहे.
advertisement
जड वाहनाने नियंत्रण गमावलं अन्... - अमितेश कुमार
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणतात, "पुणे-बेंगळुरू महामार्गावर आज नवले पुलाजवळ एका जड वाहनाने नियंत्रण गमावलं याच कारणामुळे हा अपघात घडला. जड वाहनाने अनेक वाहनांना धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हजेरी लावली आणि परिस्थिती हाताळली. ट्रॅफिक देखील आता सुरळीत झालं आहे. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. आम्ही मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.
कंटेनर चालकाचाही मृत्यू
दरम्यान, एका भरधाव कंटेनरचं ब्रेक फेल झालं. ब्रेक फेल झाल्यानंतर कंटेनरनं समोर येईल त्या वाहनांना धडक दिली. जवळपास 20 ते 25 वाहनांना धडक दिली. या अपघातात 7 ते 8 जणांचा मृत्यू झाला आहे, या अपघातात कंटेनर चालकाचाही मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यातील नवले पुलावर संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला.
