कल्याणमध्ये सापळा रचला अन्...
पोलिसांनी तातडीने कल्याण येथे जाऊन सापळा रचला आणि त्याला अटक केली. नीलेश घायवळ टोळीतील महत्त्वाचा सदस्य असलेल्या वाघ याच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती. गुन्हेगारी कारवाया करून दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या टोळीवर पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये पुन्हा एकदा धडकी भरली आहे.
advertisement
पोलिसांकडून 17 जणांवर 'मोक्का'
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी कठोर पाऊले उचलली आहेत. याअंतर्गत कुख्यात गुंड नीलेश घायवळ टोळीवर नुकतीच 'मोक्का' (MCOCA - महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. कोथरूड गोळीबार आणि धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी 17 जणांवर 'मोक्का' कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी
दरम्यान, पोलीस आयुक्तांनी गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांच्या आणि साथीदारांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गुंडगिरी आणि दहशतीच्या बळावर जमवलेल्या बेकायदा मालमत्तेची माहिती संकलित केली जात आहे. नीलेश घायवळ आणि गजानन मारणे टोळीसह बंडू आंदेकर आणि टिपू पठाण यांसारख्या गुन्हेगारी टोळ्यांच्या आर्थिक व्यवहारांवर आणि मालमत्तांवर पोलीस आता विशेष लक्ष देत आहेत.
