अंजलीचं एक्ट्रा मॅरेटियर अफेअर?
समीरने अंजलीविरुद्ध एकही पुरावा ठेवला नाही. अनेक अँगलने समीरने पत्नीविरुद्ध पुरावे रचण्यास सुरूवात केली. समीरचे एका मुलीसोबत विवाहबाह्य संबंध होते. पण समीरने पत्नी अंजलीचं एक्ट्रा मॅरेटियर अफेअर असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. समीरने अंजलीविरुद्ध एक डिजिटल पुरावा रचल्याचं पहायला मिळालं.
मित्राच्या फोनवरून आय लव्ह यूचा मेसेज
advertisement
पत्नी अंजलीच्या चारित्र्यावर संशय यावा यासाठी समीरने स्वत: पत्नीच्या मोबाईलवरून मित्राला आय लव्ह यूचा मेसेज केला अन् मित्राच्या मोबाईलमधून त्या आय लव्ह यूला रिप्लाय देखील केला. यामुळे पत्नीच्या चारित्र्यावर संशय येईल, असा डिजिटल पुरावा तयार केला गेला. मात्र, समीरचं वागणं पोलिसांना खटकलं अन् संशयाची सुई पुन्हा समीरवर गेली.
'दृश्यम' चित्रपट चार वेळा पाहिला अन्...
दरम्यान, समीरच्या जबाबांमध्ये आणि तांत्रिक पुराव्यांमध्ये तफावत आढळल्याने त्याला अधिक चौकशीसाठी बोलावण्यात आले. तिथे त्याने 'दृश्यम' हा चित्रपट चार वेळा पाहून गुन्हा कबूल केला. आपणच अंजलीच्या हत्येची योजना आखली होती, असं त्याने कबूल केलं आहे. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
