पेट्रोल पंपाजवळ गणेश काळेची हत्या
काही दिवसांपूर्वी पुण्यातील नाना पेठ परिसरात माजी नगरसेवक वनराज आंदेकर खुनातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा खून करण्यात आला होता. त्या प्रकरणात पोलिसांनी सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीला अटक केली होती. त्याचबरोबर संपूर्ण आंदेकर टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या होत्या. आता त्याच पार्श्वभूमीवर कोंढवा परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ गणेश काळेची हत्या करण्यात आली होती.
advertisement
चारही आरोपी स्वराज वाडेकर याचे मित्र
पोलिसांनी प्रकरणाचा तपास केल्यानंतर काही आरोपींच्या मुसक्या आवळ्या आहे. पोलिसांनी अटक केलेले चारही आरोपी हे आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी आणि बंडू आंदेकरचा नातू स्वराज वाडेकर याचे मित्र आहेत. त्यामुळे गणेश काळेचा खूनही वनराजच्या खुनाचा बदला असल्याचं स्पष्ट झालं आहे, असंही पोलिसांनी सांगितलं आहे. गुन्हे शाखा आणि परिमंडळ पाच यांची मिळून एकूण दहा पथके आरोपींचा शोध घेत होती.
साताऱ्याच्या दिशेने पळून जाताना चारही आरोपींना अटक
दरम्यान, गणेश कोमकरची खून झालेल्या घटना स्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा च्या माध्यमांतून देखील आरोपींचा शोध घेतला जात असताना, साताऱ्याच्या दिशेने पळून जाणार्या चार आरोपींना खेड शिवापूर येथून अमन शेख,अरबाज पटेल यांच्यासह दोन अल्पवयीन अशी एकूण चार जणांना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.
