नशेच्या आहारी गेला अन्...
आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव समीर हमीद शेख (40, रा. गल्ली नं. 13, आंबेडकर नगर, मार्केटयार्ड) असं आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शेख हा रेकॉर्डवरील आरोपी होता. त्याची मानसिक स्थिती अस्थिर होती आणि तो काही काळापासून नशेच्या आहारी गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने घटनेच्या दिवशी मंगळवारीही नशा केली होती.
advertisement
उड्डाणपुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न
पोलिसांनी सांगितलं की, समीर शेख वारंवार आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांच्याकडे होती. 16 नोव्हेंबर रोजीही त्याने पुलगेट चौकाजवळील उड्डाणपुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नांमुळे पोलिसांनी त्याला समुपदेशनासाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. समुपदेशन सुरू असतानाच, संधी साधून समीरने कृषी महामंडळाच्या उंच इमारतीकडे धाव घेतली आणि तिथून खाली उडी मारली.
काही न सांगता बेपत्ता
दरम्यान, शेख व्यसनमुक्ती केंद्रातील समुपदेशकांना काही न सांगता बेपत्ता झाला होता. घरी परतल्यानंतर त्याने पत्नीला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास त्याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या छतावरून उडी मारली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.
