दीपकच्या पत्नीचा धक्कादायक आरोप
दीपक बोबडे (वय 50, रा. दळवीनगर, आंबेगाव बुद्रुक, पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दीपक यांची पत्नी स्वाती बोबडे यांनी या संदर्भात आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अजित जाधव आणि रवींद्र राऊत नावाच्या दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोघांनी दीपकला त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
नोकरीवरून काढून टाकलं अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक बोबडे हे एका खासगी कंपनीत कामाला होते. मात्र, आरोपींनी त्यांना त्रास देऊन आणि छळ करून नोकरीवरून काढून टाकले होते. नोकरी गमावल्यामुळे दीपक बोबडे नैराश्यात गेले. याच नैराश्यातून त्यांनी गुरुवारी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एका लॉजमध्ये जाऊन गळफास लावून आपले जीवन संपवले.
लॉजवर जाऊन आत्महत्या का केली?
तक्रारदार स्वाती बोबडे यांनी केलेल्या आरोपानुसार, पतीला त्रास देऊन कामावरून काढून टाकल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली. आंबेगाव पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. पण लॉजवर जाऊन आत्महत्या का केली? याचा तपास देखील पोलिसांकडून केला जात आहे.
