नेमकी घटना काय?
भेकराई नगर परिसरात राहणारा २७ वर्षीय तरुण एका खासगी कंपनीत नोकरी करतो. बुधवारी (२१ जानेवारी) रात्री काम संपवून तो आपल्या दुचाकीवरून सासवड रोडने घरी जात होता. फुरसुंगी येथील एनआयबीएम (NIBM) कंपनीजवळ आल्यानंतर, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्याला थांबवण्याचा इशारा केला.
advertisement
बोलण्यात गुंतवून लूट: चोरट्यांनी काहीतरी विचारण्याच्या बहाण्याने तरुणाला बोलण्यात गुंतवले. तरुणाला काही समजण्याच्या आतच, चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील सोन्याच्या चेनवर झडप घातली आणि ती हिसकावून सुसाट वेगाने पसार झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुण गोंधळून गेला होता. त्याने आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत चोरटे नजरेआड झाले होते.
फिर्यादी तरुणाने दिलेल्या वर्णनानुसार, पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. सासवड रोडवरील पेट्रोल पंप आणि आसपासच्या दुकानांमधील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले जात आहेत. रात्रीच्या वेळी निर्मनुष्य ठिकाणी कोणाशीही बोलण्यासाठी थांबू नका आणि मौल्यवान दागिने सुरक्षित ठेवा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
