गजा मारणे टोळीतील गुंड सुनील बनसोडे ताब्यात
पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे टोळीतील गुंड सुनील बनसोडे याला कोथरूड पोलिसांनी मध्यरात्री वारजे माळवाडी परिसरातून ताब्यात घेतले आहे. बनसोडे याच्या विरोधात मोका (MCOCA) सह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता. अशातच काल पोलिसांनी सुनील बनसोडे याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
advertisement
गजा मारणे टोळीचा 'शार्प शूटर'
सुनील बनसोडे याची ओळख गजा मारणे टोळीतील 'शार्प शूटर' म्हणून आहे. मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर छापा टाकत त्याला अटक केली. अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या या गुंडाला ताब्यात घेणे, हे पुणे पोलिसांसाठी एक महत्त्वाचे यश मानले जात आहे. सुनील बनसोडे या पुण्यात कोणता प्लॅन होता का? असा सवाल देखील विचारला जात आहे. पोलीस आता सुनील बनसोडेची चौकशी करत आहेत.
गजा मारणे सांगलीतील जिल्हा कारागृहात
दरम्यान, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ मंत्र्यांच्या कार्यालयातील एकाला मारहाण प्रकरणात अटक करून मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला सांगलीतील जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आलं होतं. या प्रकरणात रुपेश मारणे आणि गजा मारणे या दोघांना देखील पोलिसांनी या गुन्ह्यात आरोपी केलं होतं. त्यानंतर गजा मारणे याला सांगली कारागृहात पाठवल्याने पुण्यातील गँगवॉर संपेल, अशी शक्यता होती. मात्र, पुण्यातील गँगवॉर आंदेकर टोळीच्या करारनाम्यानंतर आणखी भडकल्याचं पहायला मिळतंय.
