नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २४ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वापाच ते रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या घरी जात असताना आरोपी आशिष सुर्वे (२०) आणि अर्जुन (२०) यांनी तिला वाटेत अडवलं. आशिषने मुलीचा हात धरून मिठी मारली आणि तिचा विनयभंग केला.
धक्कादायक! स्वारगेट परिसरात दुचाकीवर जात होता तरुण; अचानक चर्रकन चिरला गळा, थरकाप उडवणारी घटना
advertisement
आरोपींनी त्या मुलीला जबरदस्तीने अर्जुनच्या घरी नेलं. तिथे तिला मारहाण करण्यात आली आणि जबरदस्तीनं दारू पाजण्यात आली. नशेत असलेल्या मुलीशी आशिष सुर्वे याने अश्लील वर्तन केलं. या गंभीर प्रसंगानंतर पीडित मुलीने हिंमत दाखवून पोलिसांत धाव घेतली.
येवलेवाडी पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध विनयभंग, मारहाण आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पठाण या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पुण्यातील उपनगरांमध्ये महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
