नेमकी घटना काय?
सचिन बाळासाहेब शिंदे असे लाच घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. एका गुन्ह्यामध्ये गाडी जप्त न करण्यासाठी आणि तपासात प्रत्यक्ष मदत करण्यासाठी शिंदे यांनी १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. "रक्षकच जेव्हा अशा प्रकारे वसुलीला उतरतात, तेव्हा सामान्यांनी कोणाकडे पाहायचे?" असा सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे.
advertisement
एसीबीचा 'मुळशी' पॅटर्न
तक्रारदाराने या लाचेबाबत पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली होती. त्यानुसार, उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी मुळशी परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाचेचा पहिला हप्ता म्हणून ३५ हजार रुपये स्वीकारताना सचिन शिंदे यांना पथकाने झडप घालून ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल आणि तपास
रात्री उशिरा शिंदे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये पौड पोलीस ठाण्यातच गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. केवळ पुणेच नव्हे, तर बीडमध्येही काल अशाच प्रकारे एका तहसीलदाराला लाच घेताना पकडण्यात आले, ज्यामुळे महसूल आणि पोलीस अशा दोन्ही विभागांतील 'भक्षक' प्रवृत्ती उघड झाली आहे.
