उडवाउडवीची उत्तरे दिली अन्...
खंडणीविरोधी पथकातील पोलीस हवालदार अमोल आवाड आणि मयूर भोकरे हे गस्त घालत होते. त्यावेळी तुपसुंदर याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याने पिस्तूल कसबा पेठेतील घरात ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तेथे गेले. पोलिसांनी त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवल्या.
advertisement
एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त
चौकशीत आरोपीने पिस्तूल एका पिशवीत ठेवल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. शेख याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आधीपासूनच दाखल असून, त्याची चौकशी सुरू आहे. आरोपीचा कोणत्या टोळीशी संबंध आहे का? याचा शोध देखील घेतला जात आहे.
गुन्हे शाखेची कामगिरी
दरम्यान, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे यांनी ही कामगिरी केली.