हिलेशी लैंगिक संबंध अन् 5 ते 25 लाख मिळवा
फेसबुक, टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया अॅप्सवर फोटो किंवा व्हिडिओ स्वरूपात जाहिरातींद्वारे, लोकांना महिलेशी लैंगिक संबंध ठेवून गर्भवती राहण्याचं आमिष दाखवलं जातं आणि या कामासाठी 5 ते 25 लाख रुपये मिळवले जाईल, असं सांगितलं जातं. 'ऑल इंडिया प्रेग्नन्सी जॉब सर्व्हिस' असं या व्हिडीओमध्ये लिहिलं आहे. व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर 10 मिनिटांची एक व्यक्ती फोन करतो. महिला गर्भवती राहिल्यास तुम्हाला पैसे मिळतील, असं सांगितलं जातं. जर तुम्हाला नोकरीसाठी नोंदणी करायची असेल तर तुम्हाला 799 रुपये द्यावे लागतील, असं सांगितलं जातं.
advertisement
फेक न्यायालयीन कागदपत्रे
मुंबईतील एका कंपनीत काम करावं लागेल, असं सांगितलं जातं. करार केल्यानंतर, त्याला ज्या महिलेची गर्भधारणा करायची आहे त्याची माहिती पाठवली जाईल. समोरच्या व्यक्तीकडून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल 5 लाख आणि ती गर्भवती राहिल्यास अतिरिक्त 8 लाख देण्याचे आश्वासन दिलं जातं. काही न्यायालयीन कागदपत्रे तयार करावी लागतील आणि ज्यासाठी 2550 रुपये, 4500 रुपये सुरक्षा ठेव म्हणून आणि 7998 रुपये जीएसटी म्हणून त्याला मिळणाऱ्या 5 लाख रुपयांना द्यावे लागेल, असं सांगून 16 हजार रुपये लुटले जातात.
जर पैसे देण्यास नकार दिला तर...
गर्भधारणा पडताळणी फॉर्म, दिला जातो. त्यानंतर आरोपी त्यांना आठ महिलांचे फोटो पाठवतात आणि यापैकी कोणत्या महिलेला गर्भधारणा करायची आहे, याबद्दल विचारतात. त्यानंतर, तुमच्या शहरातील एका हॉटेलमध्ये एक खोली बुक केली जाईल, जिथे तुम्ही त्या महिलेला भेटाल, असं आश्वासन दिलं जातं. त्यानंतर खात्यात 5 लाख 12 हजार रुपये जमा झाले होते, परंतु पैसे रोखण्यात आले होते. 12600 रुपये आयकर भरल्यानंतरच पेमेंट करता येते. जर पैसे देण्यास नकार दिला तर पैसे खात्यात जमा झाले आहेत. आता आयकर अधिकारी तुमच्या घरी छापा टाकतील आणि तुम्हाला पकडतील, अशी भीती दाखवण्यात येते.
रॅकेटची सुरूवात कशी झाली?
दरम्यान, 'ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सर्व्हिस' नावाचे राष्ट्रीय स्तरावरील रॅकेट चालू आहे. 2022 च्या अखेरीस बिहारमधील नवादा जिल्ह्यातून त्याची सुरुवात झाली. नवादा हे या रॅकेटचे केंद्र राहिले आहे आणि ही फसवणूक आता एका मोठ्या सायबर फसवणुकीच्या नेटवर्कमध्ये वाढली आहे. नवादा सायबर सेल टीमने गेल्या वर्षी ८ जणांना अटक केली होती, अनेक मोबाईल आणि प्रिंटर जप्त करण्यात आले होते. या घोटाळ्यात, सायबर गुन्हेगार ऑनलाइन डेटिंग अॅप्स आणि सोशल मीडियाद्वारे बनावट संबंध निर्माण करत असल्याची माहिती समोर आली आहे.
