TRENDING:

Vanraj Andekar Murder Case : पुण्यातील वनराज आंदेकर हत्या प्रकरणात 21 जणांविरोधात आरोपपत्र, 1700 पानाच्या चार्टशीटमध्ये काय?

Last Updated:

Pune Crime Vanraj Andekar Murder Case : वनराज आंदेकर याचा पुण्यातील रास्ता पेठेत खून करण्यात आला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकूण 21 आरोपींविरोधात तब्बल 1700 पानांचे दोषारोपपत्र (Charge sheet) दाखल केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
Pune Vanraj Andekar Murder Case : पुण्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला हादरवणाऱ्या वनराज आंदेकर खून प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. वनराज आंदेकर याचा पुण्यातील रास्ता पेठेत खून करण्यात आला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकूण 21 आरोपींविरोधात तब्बल 1700 पानांचे दोषारोपपत्र (Charge sheet) दाखल केलं आहे. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात सविस्तर पुरावे सादर केले असून, यामुळे आता कायदेशीर प्रक्रियेला वेग आला आहे.
Vanraj Andekar Murder Case 1700 pages Chargesheet against 21 people
Vanraj Andekar Murder Case 1700 pages Chargesheet against 21 people
advertisement

वनराज आंदेकर याचा खून का झाला?

वनराज आंदेकर याचा खून हा केवळ वैयक्तिक कारणातून झालेला नाही. कौटुंबिक संपत्तीवरून असलेले जुने वाद, टोळी युद्ध आणि परिसरातील आर्थिक वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हा कट रचला गेल्याचे स्पष्ट झालं आहे, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी न्यायलयात केला. या वर्चस्ववादामुळेच आंदेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचं पोलिसांनी तपासात नमूद केलं आहे.

advertisement

आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी, आंदेकरांचे जावई जयंत आणि गणेश याचा समावेश आहे. यासोबतच प्रकाश कोमकर आणि कुख्यात टोळीप्रमुख सोम्या उर्फ सोमनाथ गायकवाड यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपींनी संगनमताने हा हत्येचा कट अंमलात आणल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

advertisement

आरोपींविरोधातील गुन्हे निश्चित?

सध्याच्या सुनावणीवेळी या प्रकरणाचे तपास अधिकारी आणि बचाव पक्षाचे वकील न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे तांत्रिक कारणास्तव आरोप निश्चितीची प्रक्रिया होऊ शकली नाही. न्यायालयाने आता पुढील तारीख दिली असून, त्या दिवशी सर्व पक्षांच्या उपस्थितीत आरोपींविरोधातील गुन्हे निश्चित केले जातील, ज्यामुळे प्रकरणाची पुढील दिशा स्पष्ट होईल.

1700 पानाच्या चार्टशीटमध्ये काय?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली अन् ‘मायमराठी’च्या सेवेत हजर, पुणेकराचं काम पाहाल, तर सलाम कराल, Vid
सर्व पहा

दरम्यान, आरोप निश्चितीची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खटल्याच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. पुणे शहराला हादरवून सोडणाऱ्या या हत्याकांडाचा निकाल काय लागणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तप 1700 पानाच्या चार्टशीटमध्ये काय काय आहे? असा सवाल देखील उपस्थित होताना दिसतोय.

मराठी बातम्या/पुणे/
Vanraj Andekar Murder Case : पुण्यातील वनराज आंदेकर हत्या प्रकरणात 21 जणांविरोधात आरोपपत्र, 1700 पानाच्या चार्टशीटमध्ये काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल