प्रकरण काय आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी अमितकुमार कृष्णमोहन गोस्वामी (२८, रा. मालाड, मुंबई) यांची काही काळापूर्वी ओळख झाली होती. अमितकुमारने तरुणीला लग्नाचं खोटं आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. विश्वास संपादन केल्यानंतर, त्याने गेल्या दहा महिन्यांत (एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६) विविध घरगुती आणि वैयक्तिक कारणं सांगून तरुणीकडून वेळोवेळी तब्बल २५ लाख ७६ हजार रुपये उकळले.
advertisement
सावधान! रात्री एकटे फिरू नका; पुण्यातील या भागात नागरिकांना आवाहन, नेमकं काय घडतंय?
जेव्हा तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली, तेव्हा आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणीनं आपले पैसे परत मागितले. मात्र, पैसे देण्याऐवजी आरोपीने तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर या छळाला कंटाळून तरुणीने वाघोली पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या तक्रारीवरून पोलिसांनी अमितकुमार गोस्वामी विरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक थोरात या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. मॅट्रिमोनिअल साईट्स किंवा सोशल मीडियावरून ओळख झालेल्या व्यक्तींना मोठे आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
