TRENDING:

Pune Crime : पुणे सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात! उद्या तुमचाही नंबर असेल, चोरट्यांकडून तब्बल 97 लाखांची फसवणूक

Last Updated:

Pune Crime News : महात्मा फुले पेठेतील एका तरुणाला 'वर्क फ्रॉम होम'चे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी 11 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pune Cyber Crime : गेल्या काही दिवसांपासून सायबर चोरट्यांकडून नागरिकांना वेगवेगळी आकर्षक आमिषे दाखवून आर्थिक फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. नुकत्याच समोर आलेल्या काही प्रकरणांमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, वर्क फ्रॉम होम तसेच पोलिसांकडून कारवाई होईल अशी भीती दाखवून चोरट्यांनी तब्बल 97 लाख 76 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
Pune Cyber Crime News
Pune Cyber Crime News
advertisement

भारती विद्यापीठ स्टेशनमध्ये तक्रार

कात्रजमधील एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल असे सांगून जाळ्यात ओढले. या नागरिकाच्या मोबाइलवर संपर्क साधून त्यांना गुंतवणुकीची माहिती देण्यात आली आणि आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला त्यांनी काही रक्कम चोरट्यांच्या खात्यात जमा केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा मिळाल्याचे भासवले, ज्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांनी आणखी रक्कम जमा केली. अशा प्रकारे एकूण 29 लाख 69 हजार रुपये जमा झाल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल नंबर बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

advertisement

33 लाख 12 हजार रुपयांची फसवणूक

याचप्रकारे, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने आणखी दोन फसवणुकीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पुणे शहरातील काळेपडळ येथे एका तरुणाची 33 लाख 12 हजार रुपयांची फसवणूक झाली असून, या तरुणाने काळेपडळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तर बिबवेवाडी भागात एका तरुणाला याच पद्धतीने 4 लाख रुपयांना गंडवले असून, त्यांनी बिबवेवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे.

advertisement

'वर्क फ्रॉम होम'चं आमिष

महात्मा फुले पेठेतील एका तरुणाला 'वर्क फ्रॉम होम'चे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी 11 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक केली. ऑनलाइन काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे मेसेज पाठवून त्याला गंडवण्यात आले. या तरुणाने खडक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

मनी लॉन्ड्रिंगसाठीच्या नावाने भीती

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एका एकरात केली काकडी लागवड, 60 दिवसांत 1 लाख कमाई,शेतकऱ्याने सांगितला फॉर्म्युला
सर्व पहा

कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ व्यक्तीला वेगळ्याच पद्धतीने जाळ्यात ओढण्यात आले. 'मनी लॉन्ड्रिंगसाठी' (Money Laundering) तुमच्या बँक खात्याचा वापर करण्यात आला आहे आणि तुमच्यावर लवकरच कायदेशीर कारवाई होईल, अशी भीती दाखवून सायबर चोरट्यांनी या ज्येष्ठाची 19.60 लाख रुपयांची फसवणूक केली.

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुणे सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात! उद्या तुमचाही नंबर असेल, चोरट्यांकडून तब्बल 97 लाखांची फसवणूक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल