नेमकी काय घडली घटना?
खोर येथील ढोरजे वस्तीवर राहणारे ज्ञानेश्वर बबन डोंबे (वय ३२) हे आपल्या कुटुंबासह अक्कलकोट, तुळजापूर आणि सोनोरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत रविवारी रात्री चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. चोरट्यांनी इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने हे काम केले की, घरासमोरील वीजपुरवठाही बंद करून टाकला होता.
advertisement
१४ लाखांची लूट
डोंबे कुटुंब रविवारी मध्यरात्री घरी परतले तेव्हा घराचे कुलूप तुटलेले दिसले. आत गेल्यावर घरातील कपाटे उचकटलेली होती. चोरट्यांनी साडेसात तोळे सोने, चांदीच्या पट्ट्या आणि रोख २ लाख ३५ हजार रुपये असा एकूण १४ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या जुन्या किमतीनुसार हा ऐवज ६ लाखांचा दिसत असला, तरी सध्याच्या बाजारभावानुसार तो ११ लाख २४ हजार रुपयांचा आहे.
परिसरात भीतीचे वातावरण
या घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी पथकासह धाव घेतली. पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना पाचारण केले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. खोर परिसरात या चोरीमुळे भीतीचे वातावरण असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
