TRENDING:

पुण्यात नामांकित डॉक्टरनं राहत्या घरात संपवलं आयुष्य; मृत्यूआधी लिहिलेल्या नोटमधील 'ते' कारण वाचून सगळे चक्रावले

Last Updated:

डॉ. पाटील हे शहरातील एका प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ पदावर कार्यरत होते. शुक्रवारी दुपारी त्यांचे कुटुंबीय बाहेर असताना त्यांनी राहत्या घरात टोकाचे पाऊल उचलले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील दंत वैद्यकशास्त्र (Dental Science) विभागप्रमुखाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (६ मार्च) घडली. डॉ. राजू पाटील (वय ४५) असे या मृत प्राध्यापकाचे नाव असून, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
डॉक्टरनं राहत्या घरात संपवलं आयुष्य (प्रतिकात्मक फोटो)
डॉक्टरनं राहत्या घरात संपवलं आयुष्य (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

घटनेचा थरार

डॉ. पाटील हे शहरातील एका प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ पदावर कार्यरत होते. शुक्रवारी दुपारी त्यांचे कुटुंबीय बाहेर असताना त्यांनी राहत्या घरात टोकाचे पाऊल उचलले. दुपारी जेव्हा त्यांची पत्नी घरी परतली, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आपल्या पतीला अशा अवस्थेत पाहून त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

एका महिन्यात तीनदा विकलं, 21 वर्षीय विवाहितेसोबत भयंकर घडलं, बीडला हादरवणारी घटना

advertisement

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?

घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी एक 'सुसाईड नोट' (चिठ्ठी) सापडली आहे. प्राथमिक तपासानुसार, डॉ. पाटील यांनी कामाच्या अति ताणामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यात नमूद केले आहे. मोठ्या हुद्द्यावर असूनही कामाचा मानसिक ताण एका तज्ज्ञ डॉक्टरला अशा निर्णयापर्यंत घेऊन गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दरात वाढ नाहीच, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

सिंहगड रस्ता पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, डॉ. पाटील यांच्या सहकाऱ्यांची आणि कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात नामांकित डॉक्टरनं राहत्या घरात संपवलं आयुष्य; मृत्यूआधी लिहिलेल्या नोटमधील 'ते' कारण वाचून सगळे चक्रावले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल