TRENDING:

धक्कादायक! घराची चावी चप्पलच्या स्टँडमध्ये ठेवली, छोटी चूक अन् पुण्यातील महिलेसोबत नको ते घडलं

Last Updated:

घराच्या बाहेर किंवा चपलांच्या स्टँडमध्ये चावी लपवून ठेवण्याची तुमची सवय तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: घराच्या बाहेर किंवा चपलांच्या स्टँडमध्ये चावी लपवून ठेवण्याची तुमची सवय तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी पादत्राणांच्या जाळीत ठेवलेली चावी शोधून काढली आणि आरामात घर उघडून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
घराची चावी चप्पलच्या स्टँडमध्ये ठेवणं भोवलं (प्रतिकात्मक फोटो)
घराची चावी चप्पलच्या स्टँडमध्ये ठेवणं भोवलं (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमकं काय घडलं?

धायरीतील रायकर मळा परिसरात असलेल्या 'श्री हाईट्स' इमारतीत तक्रारदार महिला वास्तव्यास आहेत. १६ मार्च रोजी सकाळी १० च्या सुमारास त्या नेहमीप्रमाणे घर बंद करून कामाला निघाल्या. घरातील इतर सदस्यांच्या सोयीसाठी त्यांनी घराची चावी दरवाजाबाहेर असलेल्या पादत्राणांच्या जाळीत लपवून ठेवली होती. मात्र, पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांचे हे कृत्य नजरेतून सुटले नाही.

advertisement

ॲपवर दाखवलेली रक्कम की मीटरप्रमाणे भाडं? वादाला भयंकर वळण, कॅब चालकानं दातानं तोडलं हिंजवडीतील आयटी इंजिनिअरचं बोट

भरदिवसा धाडसी चोरी

महिला कामावर गेल्याची खात्री पटताच चोरट्यांनी जाळीतून चावी काढली आणि घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. सायंकाळी साडेसहा वाजता जेव्हा महिला घरी आली, तेव्हा घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाला मिळेना योग्य भाव, शेतकऱ्याने केला भारी प्रयोग, आता 9 लाख रुपयांचा नफा
सर्व पहा

नांदेड सिटी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
धक्कादायक! घराची चावी चप्पलच्या स्टँडमध्ये ठेवली, छोटी चूक अन् पुण्यातील महिलेसोबत नको ते घडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल