ॲपवर दाखवलेली रक्कम की मीटरप्रमाणे भाडं? वादाला भयंकर वळण, कॅब चालकानं दातानं तोडलं हिंजवडीतील आयटी इंजिनिअरचं बोट
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
प्रवासाच्या भाड्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका माथेफिरू कॅब चालकाने 42 वर्षीय आयटी इंजिनिअरच्या डाव्या हाताचे बोट चक्क दातात धरून चावून तोडलं.
पुणे: आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. प्रवासाच्या भाड्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका माथेफिरू कॅब चालकाने 42 वर्षीय आयटी इंजिनिअरच्या डाव्या हाताचे बोट चक्क दातात धरून चावून तोडलं. या भीषण हल्ल्यात इंजिनिअरच्या बोटाचा वरचा काही भाग बोटापासून वेगळा झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
नाना पेठ परिसरात राहणारे तक्रारदार तंत्रज्ञ हिंजवडी फेज 1 मधील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत आहेत. सोमवारी शिफ्ट संपल्यानंतर त्यांनी घरी जाण्यासाठी 'रॅपिडो' ॲपवरून कॅब बुक केली होती. कॅब चालक आल्यावर त्याने ॲपवर दाखवलेल्या भाड्यापेक्षा 'मीटर'प्रमाणे जास्त पैसे देण्याचा हट्ट धरला. इंजिनिअरने जादा पैसे देण्यास नकार देताच दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
advertisement
प्रवास सुरू होण्यापूर्वीच हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापलेल्या चालकाने इंजिनिअरवर हल्ला केला. झटापटीत त्याने इंजिनिअरचा हात तोंडात धरला आणि इतक्या जोरात चावा घेतला की बोटाचा तुकडाच पडला. रक्ताळलेल्या अवस्थेत पीडित प्रवाशाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
advertisement
घटनेनंतर पीडित इंजिनिअरने हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्परता दाखवत गुन्हा दाखल केला असून आरोपी कॅब चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे पुण्यातील ॲप-आधारित टॅक्सी सेवा आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 1:35 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
ॲपवर दाखवलेली रक्कम की मीटरप्रमाणे भाडं? वादाला भयंकर वळण, कॅब चालकानं दातानं तोडलं हिंजवडीतील आयटी इंजिनिअरचं बोट







