मिडिल क्लास लोकांसाठी बेस्ट आहे Hondaची स्वस्त मोटरसायकल! किंमत 65,000 रुपयांपासुन सुरू
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुम्हालाही आता ऑटोने फिरुन फिरुन किंवा बसचे धक्के खायचा कंटाळाला आलाय का? यामुळेच तुम्हीही नवी मोटरसायकल घेण्याचा विचार करत असाल तर आज आपण एक बेस्ट ऑप्शन पाहणार आहोत. जे मिडिल क्लास लोकांसाठी सर्वात बेस्ट आहे.
Honda Shine 100: ही कंपनीची सर्वात परवडणारी मोटरसायकल आहे. जी ग्रामीण आणि शहर दोन्ही क्षेत्रांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. या मोटरसायकलची एक्स-शोरुम किंमत जवळपास 65,000 रुपयांपासून सुरू होते. ही बाइक अशा लोकांसाठी बेस्ट आहे. ज्यांना कमी किंमतीत विश्वासार्ह ब्रांड आणि खुप कमी मेंटेंनेंसची गाडी हवी आहे.
advertisement
या बाइकमध्ये 98.98 cc चं PGM-FI इंजिन लावलं आहे. जे 70 kmpl पर्यंत शानदार मायलेज देते. या बाइकचे सीट लांब आणि कंफर्टेबल आहे. ज्यामुळे दूरपर्यंत प्रवास करणंही सोपं वाटतं. फीचर्सविषयी बोलायचं झाल्यास, यामध्ये कॉम्बी-ब्रेक सिस्टम (CBS) आणि हल्का चेसिस मिळते. ज्यामुळे ती ट्रॅफिकमध्येही सांभाळणे सोपे आहे.
advertisement
Honda Livo: तुम्हाला बजेटमध्ये राहून थोडा स्पोर्ट लूक हवा असेल तर होंडा लिवो एक प्रीमियम ऑप्शन आहे. या बाइकची किंमत जवळपास 79,000 रुपयांपासून सुरू होते. तिचे मस्क्युलर टँक श्राउड आणि आक्रमक फ्रंट एंड तिला 110cc सेगमेंटमधील इतर सामान्य बाइक्सपेक्षा वेगळे ठरवतात. ही बाईक तरुणांना विशेष आकर्षित करते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement






