पुणे विभागातून 74 जादा बसेसची व्यवस्था
पुणे विभागातून 74 जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे, कारण अनेकजण उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात विशेषतः विद्यार्थी, शिक्षक, विविध कार्यालयांतील कर्मचारी तसेच औद्योगिक भागातील कामगार मोठ्या प्रमाणात आपल्या गावाकडे जातात. त्यामुळे एसटी बससेवेवर प्रवाशांचा ताण वाढतो.
ही वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे एसटी विभागाकडून अतिरिक्त बसेस चालवण्याची योजना आखण्यात आली आहे. या विशेष बसेस अक्कलकोट, तासगाव, कोल्हापूर, पंढरपूर, जळगाव, कळण, सप्तशृंगी, अकोला, अहमदपूर तसेच गोंदवले या प्रमुख मार्गांवर सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
पुणे एसटी विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी सांगितले की उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे विभागातून सुमारे 74 अतिरिक्त एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांनी एसटी सेवेचा अधिकाधिक वापर करून या अतिरिक्त बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.






