खडी मशीन चौकात काय घडलं?
मयत गणेश काळे हा रिक्षा चालक आहे. गणेश येवलेवाडी परिसरात रहायला होता. ही घटना आज दुपारी खडी मशीन चौकात घडली. दोन जण गाडीवरून आले आणि गोळीबार केला. त्यानंतर मागून एक दुचाकी देखील आली होती. पुढच्या गाडीवर असलेल्या दोघा जणांनी गणेश काळेवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर चौघंही घटनेनंतर फरार झाले. हाच पॅटर्न आयुष कोमकरच्या हत्येवेळी पहायला मिळाला होता. आयुषवर दोघांनी गोळीबार केला तर दोघंजण गाडीवर मागे थांबलेले होते. गणेश काळेवर चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
advertisement
गणेश काळेच्या हत्येचा पॅटर्न सेम
गणेश काळेवर हल्लेखोरांनी सलग सहा गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर खात्री करण्यासाठी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. आयुष कोमकरच्या प्रकरणात देखील असंच पहायला मिळालं होतं. त्यामुळे या प्रकरणाला गँगवॉ़रची किनार आहे का? असा सवाल विचारला जात आहे. आंदेकर टोळीकडून आयुष कोमकरची हत्या करण्यात आल्यानंतर टोळी प्रमुख बंडू आंदेकरसह अनेकांना अटक करण्यात आली होती. मात्र, तरीही आंदेकर टोळी सक्रिय असल्याचं या हत्येतून दिसून आलं आहे.
पुणे पोलिसांवर अनेक प्रश्नचिन्ह
दरम्यान, वनराज आंदेकरच्या हत्येवेळी समीरसह आबा खोंड, आकाश म्हस्के आणि संगम वाघमारे या चौघांनी मिळून 9 पिस्तुले धुळेमार्गे मध्यप्रदेशातून आणल्याची माहिती तपासात समोर आली होती. अशातच आता समीर काळेच्या भावाचा गेम वाजवण्यात आल्याने पुणे पोलिसांवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
