TRENDING:

Pune News: 'मृत्यूनंतरही वेटिंग'! युद्धाच्या झळा थेट पुण्याच्या स्मशानभूमीपर्यंत, शहरातील 18 गॅस दाहिन्या बंद, अंत्यसंस्कारासाठी उरला हा एकमेव पर्याय

Last Updated:

इंधन टंचाईच्या वाढत्या झळांमुळे पुणे महापालिकेने शहरातील तब्बल १८ गॅस दाहिन्या पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : जागतिक स्तरावर सुरू असलेल्या अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचे परिणाम आता थेट पुणेकरांच्या आयुष्यावर दिसून येत आहेत. इंधन टंचाईच्या वाढत्या झळांमुळे पुणे महापालिकेने शहरातील तब्बल १८ गॅस दाहिन्या पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रियजनांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठीही आता पुणेकरांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.
युद्धाच्या झळा थेट पुण्याच्या स्मशानभूमीपर्यंत (प्रतिकात्मक फोटो)
युद्धाच्या झळा थेट पुण्याच्या स्मशानभूमीपर्यंत (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

शहरातील व्यावसायिक स्वरूपाच्या गॅस पुरवठ्यावर सध्या मोठ्या प्रमाणात निर्बंध आले आहेत. व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे महापालिकेने वैकुंठ स्मशानभूमीसह विश्रांतवाडी, कोरेगाव पार्क, औंध, कात्रज आणि हडपसर अशा विविध ठिकाणच्या एकूण १८ गॅस दाहिन्यांचा वापर थांबवला आहे. या दाहिन्या व्यावसायिक गॅसवर चालतात, परंतु शासनाच्या नव्या आदेशांमुळे गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.

advertisement

Pune: लहान मुलांनाही सोडलं नाही, सिंहगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला, अनेक जण जखमी, गडावरचे PHOTOS

या संकटकाळात महापालिकेने आता पर्यायी व्यवस्था म्हणून पारंपरिक लाकडी चितांचा वापर वाढवण्यावर भर दिला आहे. मात्र, यामुळे काही ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी रांगा आणि प्रतीक्षा करावी लागत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासन प्रयत्न करत असल्याचे सांगत असले, तरी सद्यस्थितीत अंत्यसंस्कारासाठीची ही प्रतीक्षा पुणेकरांच्या वेदना अधिक तीव्र करणारी ठरत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बारावीत दोनदा नापास, 7 वर्षे ड्रायव्हिंग, शेतकऱ्याच्या लेकानं ठरवलं, झाला फौजदार
सर्व पहा

महापालिकेच्या विद्युत विभागप्रमुख मनीषा शेकटकर यांनी सांगितले की, "गॅसचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतरच या दाहिन्या पुन्हा सुरू केल्या जातील. आम्ही पुरवठादार कंपन्यांशी सातत्याने संपर्क ठेवून आहोत." सध्यातरी पुणेकरांना अंत्यविधीसाठी पारंपरिक पद्धतीचाच आधार घ्यावा लागत आहे

मराठी बातम्या/पुणे/
Pune News: 'मृत्यूनंतरही वेटिंग'! युद्धाच्या झळा थेट पुण्याच्या स्मशानभूमीपर्यंत, शहरातील 18 गॅस दाहिन्या बंद, अंत्यसंस्कारासाठी उरला हा एकमेव पर्याय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल