पुणे पोलिसांनी आता तपासाची चक्र फिरवली
गौतमी पाटील हिच्या गाडीला झालेल्या अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) आता तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा केवळ अपघात होता की त्यामागे काही अन्य कारण होते, याचा छडा लावण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
advertisement
अपघातानंतर क्रेन कुणी बोलवली?
अपघात झाल्यावर गाडी बाजूला करण्यासाठी क्रेन कोणाकडून बोलावण्यात आली? यासाठी कोणी फोन केला आणि त्याचा उद्देश काय होता, याचा सविस्तर तपास केला जाईल. अपघाताच्या वेळी गौतमी पाटील वापरत असलेली गाडी कुठून आणली होती? ही गाडी भाड्याची होती की अन्य कोणाची, याबद्दलची कागदपत्रे आणि माहिती तपासली जाईल. या घटनेच्या आणि त्यापूर्वीच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत. यामुळे गाडीचा वेग, अपघाताचे नेमके कारण आणि अपघातानंतर काय घडले, याचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होऊ शकेल.
दरम्यान, अपघात झाल्यानंतर गौतमी पाटील यांच्या टीमकडून साधी विचारपूसही झाली नाही. गौतमी पाटील यांचं कार्यक्रम आजही सुरूच आहे. पण त्यांनी पुढं येऊन साधी विचारपूसही केली नाही. यामुळे त्या कुठे घाबरल्या आहेत का? या प्रकरणी आम्ही पोलीस आयुक्तांकडे जाणार आहोत, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही रिक्षाचालक मगराळे यांच्या मुलीने केली आहे.