नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार २५ डिसेंबर २०२५ पासून सुरू होता. आरोपी विजयसिंह हा गेल्या काही महिन्यांपासून पीडित तरुणीचा सतत पाठलाग करत होता. त्याने तरुणीला रस्त्यात अडवून तिच्याकडे २० लाख रुपयांची मागणी केली. "जर पैसे दिले नाहीत, तर तुझे खाजगी फोटो सार्वजनिक करेन," अशी धमकी त्याने दिली होती. तरुणीने या मागणीला भीक न घातल्याने संतापलेल्या आरोपीने तिचे काही अश्लील फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले.
advertisement
फोटोंमुळे आपली बदनामी होत असल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने धीर एकवटून वारजे माळवाडी पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास पथके रवाना केली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी विजयसिंह गुंड याला बेड्या ठोकल्या.
हा नराधम गेल्या तीन महिन्यांपासून तरुणीला मानसिक त्रास देत असल्याचे तपासात समोर आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
