पूनमचा विवाह युवराज लष्करे या रिक्षाचालकासोबत झाला होता. लग्नानंतर काही काळ लोटल्यानंतरही मूल होत नसल्याने सासरच्या मंडळींनी तिला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. तिची सासू, सासरे आणि आजेसासू हे सातत्याने तिला टोचून बोलत असत आणि तिचा छळ करत होते.
हुंड्यासाठी छळ : केवळ मूल होत नाही हेच कारण नसून, पती युवराजला नवीन रिक्षा खरेदी करायची होती. त्यासाठी त्याने पूनमच्या माहेरून पैसे आणण्यासाठी तिचा छळ सुरू केला होता. सासरच्या या दुहेरी जाचामुळे पूनम प्रचंड मानसिक तणावाखाली होती. बुधवारी (३१ डिसेंबर) या त्रासाने हतबल होऊन तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
advertisement
पूनमच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर फुरसुंगी पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तारा लष्करे (सासू), संतोष लष्करे (सासरे), बायडाबाई (आजेसासू) या तिघांनाही अटक केली आहे. पूनमचा पती युवराज लष्करे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा अधिक तपास करत आहेत.
